"अखंड सेवा, सक्षम नागरिक"

आमची यशोगाथा

1.     गावाविषयी माहिती

देहरे   हे महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील एक  प्रगतशील व ऐतिहासिक गाव आहे. देहरे  गावात मध्यभागी हनुमान मंदिरव पुर्वेस कपालेश्वर शिवमंदिर हे गावचे धार्मिक केंद्रबिंदू आहे.  सन २०११ च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या सुमारे 3462 आहे. गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा 3, अंगणवाडी केंद्रे 9 व व्यायामशाळा 1 ,सभामंडप -5 अशी शैक्षणिक व शारीरिक सुविधा उपलब्ध आहेत. सामुदायिक सभागृह, पाणीसाठवण, सार्वजनिक विहिरी अशा धार्मिक व सामाजिक सुविधा देखील आहेत. 

2.     गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून भात, नागली,वरी, उडीद, तूर,खुरसानी,कुळीत व ज्वारी ही प्रमुख पिके घेतली जातात. भात,वरी या पिकांच्या लागवडीमुळे गावातील शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते,तसेच दुग्ध व्यवसाय करतात

3.     देहरे ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत. घरकुल योजना अंतर्गत लाभार्थी यांना घरकुल चा  लाभ मिळाला आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत न्याहाळे खुर्द गावाने संपूर्ण खुले शौचमुक्त (ODF प्लस) दर्जा मिळवला आहे. जलसंधारण व  पाणीपुरवठा योजना अंतर्गत गावात पाणीपुरवठा नियमित करण्यात आला आहे. तसेच संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान मध्ये देहरे  विशेष गौरव पुरस्कार महाराष्ट्र शासन पुरस्कुत तंटामुक्ती गाव मोहीम अंतर्गत सन २००५-२००६ पारितोषिक प्राप्त गाव बक्षीस रुपये-५ लक्ष रुपये  प्राप्त झाला असून स्वच्छता अभियान पुरस्कारही जिल्हा व तालुका  पातळीवर मिळाला आहे.

4.     ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व 9 सदस्य मिळून गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणतात. ग्रामपंचायतीचे निर्णय लोकसहभागातून घेतले जातात.

5.     देहरे  गाव आज जव्हार तालुक्यातील एक आदर्श व सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करणारे गाव म्हणून ओळखले जाते.

2. भौगोलिक स्थान

देहरे  हे गाव जव्हार तालुक्याच्या ठिकाणापासून सुमारे 15 कि.मी. अंतरावर वसलेले आहे. गावाचे एकूण लागवडी योग्य  क्षेत्रफळ ५४२चौ.कि. हे आर  असून ग्रामपंचायतीमध्ये ४ वार्ड आहेत. एकूण 1101 कुटुंबे येथे वास्तव्यास असून, लोकसंख्या 3462 आहे. त्यामध्ये 1792 पुरुष व 1670 महिला यांचा समावेश होतो.

 3. लोकजीवन

देहरे गावाचे लोकजीवन साधे, श्रमप्रधान व पारंपरिक आहे. शेती हा येथील मुख्य व्यवसाय असून, भात, नागली,वरी, उडीद, तूर,खुरसानी,कुळीत व हंगामी भाजीपाला पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. शेतीसह काही लोक दुग्धव्यवसाय, यामध्येही कार्यरत आहेत.

गावात विविध सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक परंपरा जोपासल्या जातात. वर्षभरात होणारे उत्सव, सण गावाच्या एकतेचे दर्शन घडवतो. गणेशोत्सव, होळी, दिवाळी, नवरात्र तसेच स्थानिक देवतांच्या पूजांना विशेष महत्त्व आहे.

येथील लोक मेहनती, मदतशील व अतिथी देवो भव  या विचाराने वावरणारे आहेत. स्त्रियांचा सहभाग ग्रामविकास व स्वयंसाहाय्य गटांद्वारे मोठ्या प्रमाणात दिसून येतो. तरुण वर्ग शिक्षण, खेळ आणि रोजगाराच्या संधी शोधत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.

देहरे च्या लोकजीवनात पारंपरिक ग्रामीण संस्कृतीसोबतच आधुनिकतेची झलकही दिसते, ज्यामुळे गावाचा विकास आणि एकात्मता दोन्ही जोपासले जातात.

5. संस्कृती परंपरा

देहरे  गावाचे सांस्कृतिक जीवन समृद्ध आणि विविधतेने नटलेले आहे. येथे वर्षभर विविध धार्मिक,श्रावण सप्ताह, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात.तसेच गावात कपालेश्वर शिवमंदिराचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात  भरवली जाते  , सातीचा उत्सव व गावातील प्रमुख देवतांच्या पूजाअर्चा यामुळे ग्रामस्थांमध्ये एकोपा आणि श्रद्धेची भावना दृढ होते.

गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, होळी यांसारखे सण गावात उत्साहाने साजरे केले जातात. या सणांमुळे गावातील मुलं, तरुण व वयोवृद्ध सर्वच वयोगट एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा करतात.

गावात लोककला, कीर्तन, भजन आणि पारंपरिक खेळ यांचा विशेष प्रभाव दिसून येतो. पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या परंपरा जपतानाच नवीन पिढी आधुनिकतेशी जुळवून घेते.

स्त्रियांचा सहभाग ग्रामविकासात तसेच सांस्कृतिक उपक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर असतो. स्वयंसहाय्य गटांद्वारे महिला सामाजिक व आर्थिक प्रगतीत योगदान देतात.

यामुळे सोनगाव गावाचे लोकजीवन परंपरा आणि आधुनिकता यांचा सुंदर संगम साधत आजही एकात्मतेने टिकून आहे.

 6.     प्रेक्षणीय स्थळे:- ंदिरे – गावाच्या मध्यवर्ती भागात असलेले हे पुरातन काळातील हनुमान मंदिर व कपालेश्वर शिव मंदिर ,गावदेवी , म-हीआई देवस्थान ग्रामस्थांच्या भेटीगाठींचे केंद्र असते.

8.     शेती क्षेत्रदेहरे  भात,नागली,उडीद,तुर उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.

7. जवळची गावे

देहरे, कडव्याचीमाळी, उं बराचापाडा, खडकीपाडा, बोरिचापाडा, जळविहिरा, बोरिचामाळ, देवगाव, उक्षिपाडा, नवापाडा.

ग्रामपंचायत देहेरे, जव्हार

प्रगती आणि विकासकामांची संभाव्य माहिती: कोणत्याही ग्रामपंचायतीच्या प्रगतीमध्ये विविध शासकीय योजनांचा (केंद्र आणि राज्य सरकार) समावेश असतो. गावातील विकासकामे सामान्यतः खालील क्षेत्रांवर केंद्रित असतात: पायाभूत सुविधा: रस्ते, पाणीपुरवठा योजना (जल जीवन मिशन), वीजपुरवठा. शिक्षण: जिल्हा परिषद शाळांची दुरुस्ती/बांधकाम. आरोग्य: प्राथमिक आरोग्य सुविधा किंवा अंगणवाडी केंद्रे. स्वच्छता: स्वच्छता अभियान आणि घनकचरा व्यवस्थापन. रोजगार: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कामे. घरकुल योजना: प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत घरकुले.

प्रशासकीय संरचना


भारतातील पंचायती राज हे ग्रामीण स्थानिक स्वराज्य प्रणालीचे प्रतीक आहे.

जन्म, मृत्यू व विवाह यांची नोंदणी अवश्य करा...

लोकसंख्या आकडेवारी


1101
3462
1792
1670

Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo